
परंडा (दि. 15 जुलै 2025) : श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवारी रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा येथे कार्यालयीन अधीक्षकपदी श्रीमती पद्मा शिंदे यांची तर मुख्य लिपिकपदी महेश पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना संस्थेचे सचिव श्री संजय निंबाळकर यांनी ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली.पदोन्नतीनंतर श्रीमती शिंदे व श्री पडवळ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाणे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे तसेच कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख उपस्थित होते.प्राचार्य डॉ. जाधव यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पदोन्नतीमुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.