
तुळजापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांचे बंधू गणराज कडू व मंदाताई कडू सहकुटुंब तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांचा तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी बच्चुभाऊ कडू यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच विविध सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाला प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी, जिल्हा सचिव महादेव चोपदार, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष सूर्यकांत इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद इंगळे, प्रेम इंगळे, सचिन माळी तसेच प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
