ब्रह्माकुमारी आनंदनगर, धाराशिव येथे विश्वबंधुत्व दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Spread the love

200 रक्तदात्यांनी केले रक्तदान

धाराशिव, दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र, आनंदनगर येथे राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या 18व्या पुण्यतिथीनिमित्त विशाल रक्तदान शिबिर व विश्वबंधुत्व दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय दादीजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री. धनंजय चाकूरकर (सिव्हिल सर्जन, धाराशिव शासकीय रुग्णालय), डॉ. दिग्विजय दापके (सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, धाराशिव),डॉ. कुलदीप मिटकरी, तसेच ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, प्रियंका दीदी (येडशी सेवा केंद्र प्रभारी), वैजनाथ भाईजी (येरमाळा सेवा केंद्र प्रभारी) आदींच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.यावेळी मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत “रक्तदान करा व इतरांना नवजीवन द्या” अशी प्रेरणा साधकांना दिली.सिव्हिल सर्जन श्री. धनंजय चाकूरकर यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यात असे उपक्रम सिव्हिल हॉस्पिटलमध्येही राबविण्याची सूचना केली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी ब्रह्माकुमारींच्या सेवाभावाची स्तुती केली.तर सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दिग्विजय दापके यांनी “मानवतेसाठी या सेवा अद्भुत आहेत, सध्या मन:शांतीची गरज आहे” असे आवाहन केले.या शिबिरात 200 हून अधिक साधक उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. अनेक रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. रक्तदात्यांना केंद्राच्या प्रभारी ज्योती दीदी व कृष्णा दीदी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.विशेष उपस्थितीत प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूरभैया काकडे व यांनीही सहभागी होऊन रक्तदान शिबिराला प्रोत्साहन दिले.🔹 या भव्य रक्तदान शिबिराद्वारे ब्रह्माकुमारी संस्थेने पुन्हा एकदा मानवतेची सेवा व विश्वबंधुत्वाची भावना समाजापर्यंत पोहोचवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button