
ढोकी (ता. जी. धाराशिव) – दिवाळी सणानिमित्त ढोकी ग्रामपंचायतीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग बांधवांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायतीच्या 5 टक्के दिव्यांग निधीतून एकूण 190 दिव्यांग बांधवांना किराणा किट वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत उपसरपंच अमोल पापा समुद्रे, सदस्य परवेश काझी, शकील काझी, राहुल देशमुख, तसेच दिव्यांग प्रा. शाखा ढोकी चे अध्यक्ष इरफान वस्ताद, उपाध्यक्ष सबदर सय्यद, सर्व दिव्यांग बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते

.
ढोकी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम खरोखरच आदर्श घेण्यासारखा असून दिव्यांग प्रा. शाखा ढोकीतर्फे ग्रामपंचायतीचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे आणि तालुका समन्वयक दिनेश पोतदार तसेच प्रहार पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केलेल्या मागणीला प्रतिसाद देत ढोकी ग्रामपंचायतीने हा उपक्रम हाती घेतला.प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी सांगितले की, “ढोकी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आदर्श म्हणून घ्यावा आणि प्रत्येक गावाने आपल्या परिसरातील दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करावी.”या उपक्रमामुळे समाजात संवेदनशीलता, सामाजिक एकोपा आणि दिव्यांग बांधवांविषयी आत्मीयता निर्माण झाली आहे.असे सांगत ढोकी ग्रामपंचायतचे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आभार मानले आहे
