प्रहारच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातून सर्व तालुक्यात निवेदन सादर; दिव्यांग, शेतकरी आणि उपेक्षित घटकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारकडे आवाज

Spread the love

धाराशिव, दि. १४ जुलै २०२५:प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते मा. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयांमध्ये निवेदन सादर करत सरकारकडे दिव्यांग, शेतकरी व उपेक्षित घटकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची जोरदार मागणी केली.

दिनांक ७ जुलैपासून सुरु असलेली ही जनजागृती पायदळ यात्रा सुमारे ३०० किमी अंतर पार करत असून, यामार्फत सरकारचे लक्ष समाजातील वंचित, दिव्यांग, महिला, युवक व शेतकरी वर्गाच्या प्रश्नांकडे वेधले जात आहे. निवेदनाद्वारे अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये दिव्यांगांसाठी किमान ₹६००० मासिक मानधन, स्वतंत्र घरकुल योजना, दिव्यांग भवन, शैक्षणिक आरक्षण, रोजगारसाधन, डिजिटल साधने, क्रीडा-शिक्षण क्षेत्रातील योजना, व ५% खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण आदींचा समावेश आहे.

शेतकऱ्यांसाठी MREGS अंतर्गत रोजगार, विशेष अनुदान पॅकेज, ५०% कर्जमाफी, व शेतकऱ्यांना घरकुलासाठी ₹५ लाख निधी मिळावा, अशा ठोस मागण्या आहेत.त्याचबरोबर शहीद व माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक वारसदारांसाठी सन्मान योजना व आर्थिक पुनर्वसनाच्या योजनाही सुचविण्यात आल्या आहेत.

जर शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर २ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.धाराशिव जिल्ह्यातून सहभागी झालेले प्रतिनिधी:जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब पाटील, बाळासाहेब कसबे, विठ्ठल चव्हाण, नवनाथ कचार, संजय नाईकवाडी, प्रकाश खडके, धनंजय चव्हाण, दिनेश पोद्दार, बालाजी तांबे, संजय शिंदे, राजेश भिसे, रशीद शेख, अमजद शेख, बाबासाहेब भोईटे, शेख इलाही, इंद्रजीत मिसाळ, जावेद शेख, धनंजय कांबळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.तालुका निहाय सहभाग:तुळजापूर तालुका: महादेव चोपदार कदम,जिल्हा सचिव महेश माळी ,मारुती पाटील तालुकाध्यक्ष ,रवी चित्रे,आत्माराम बनसोडे,दादा जाधव,राणी मुसळेतालुका महिला प्रमुख,सूर्यकांत इंगळे,अभिषेक कोळेकर,रामा गंज पाटील,अनिल महाबोले आदी कळंब तालुका: गणेश शिंदे, कैलास यादव, शेख सादिक, नेमिनाथ आगलावे, आकाश शेळवणे, संतोष लांडगे आदी.उमरगा तालुका: इसाक शेख, रामेश्वर मदने, राहुल मन्नाडे, बाबुराव गायकवाड, शिवराज गावडे, सुवर्णा कांबळे, सुंदराबाई पवार, कावेराबाई कांबळे, रवी साळुंके, ओम कुंभार, हसन मुल्ला, कलावती गायकवाड आदींसह ३० हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

सरकारकडे निवेदन पोहोचवण्याची मागणी:या निवेदनामार्फत तहसीलदारांकडे मागण्या शासनाकडे पोहोचवून त्या तातडीने अंमलात आणाव्यात, अशी विनंती करण्यात आली. अन्यथा, प्रहार जनशक्ती पक्ष वंचितांच्या हक्कासाठी अधिक आक्रमक आंदोलन राबवेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button