गोकुळ कारखान्याच्या विरोधात प्रहार अपंग क्रांती संघटनेचा इशारा, उसाचे बिले न मिळाल्याने शेतकरी संतप्त

Spread the love

कोल्हापूर, १२ जुलै २०२५ — तुळजापूर तालुक्यातील घारापुरी येथील शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याकडे उसाचा पुरवठा केला असून, त्याचे पैसे अद्याप न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या माध्यमातून कारखान्याकडे तीव्र शब्दांत लेखी निवेदनाद्वारे तक्रार नोंदवली आहे.या निवेदनात जिल्हाउपाध्यक्ष महेश विष्णु माळी यांनी नमूद केलं आहे की, शेतकऱ्यांनी दिलेला ऊस गाळप करूनही त्याचे पैसे मिळालेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांनी हे पैसे तात्काळ न दिल्यास संघटनेच्या वतीने कारखान्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा दिला आहे.

प्रमुख मागण्या:शेतकऱ्यांचे प्रलंबित ऊस बिले तात्काळ अदा करावीत.बिल न मिळाल्यास गोकुळ शुगर कारखान्यासमोर आंदोलन छेडण्यात येईल.याची सर्वस्वी जबाबदारी कारखाना प्रशासनावर राहील.निवेदनासोबत काही शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांची यादी देखील देण्यात आली आहे, ज्यामध्ये विविध गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नावे आणि स्वाक्षऱ्या नमूद आहेत ते पुढील प्रमाणे महेश बेटकर, गणेश बेटकर,श्री बिडकर,सुधाकर सुरवसे, सोमनाथ बचाटे,विजय सुरवसे, नवनाथ सुरवसे,संभाजी सुरवसे उमाकांत चेंडके,संदीप कराळे, लक्ष्मण बचाटे, गणेश कोलते,सोमनाथ कसबेप्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने हे निवेदन मा. चेअरमन, गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड यांना पाठवले आहे. याची प्रत मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, सहकार मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button