
धाराशिव | 10 जुलै 2025 – पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक भावनेने साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंचे महत्व अधोरेखित करणारा एक मनोहारी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक आणि सर्जनशील पद्धतीने सादर केला.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:३० वाजता झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरूंच्या वेशभूषेत सुंदर सादरीकरण करून गुरू-शिष्य परंपरेचे जतन केले.

यामध्ये विद्यार्थ्यांची गुरूंविषयीची आत्मीयता व कृतज्ञता प्रकर्षाने जाणवली.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेच्या अध्यापिका आयेशा मोमीन मॅडम यांनी केले होते. शाळेचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी ठरला.डॉ. वाल्मिक सोमासे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आधुनिक काळातील गुरूंचे महत्त्व, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि बदलत्या युगानुसार शिक्षणपद्धतीत होणारे परिवर्तन यावर सखोल विचार मांडले. त्यांच्या विचारांमुळे उपस्थित सर्वांना गुरूंची भूमिका नव्याने समजून घेता आली.

या कार्यक्रमाला उपप्राचार्य श्री. निलेश जाधव सर, व्यवस्थापकीय अधिकारी श्री. जीवन कुलकर्णी सर, वरिष्ठ समन्वयक श्री. प्रभाकर चौधरी सर, कार्यक्रमाधिकारी श्री. दीपक अंकुश सर, तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुरुपौर्णिमेचा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात गुरूविषयी आदर, कृतज्ञता आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला.