
अत्याधुनिक आणि वातानुकुलीत वर्ग खोल्यांची होणार उभारणीआळणी, ता. धाराशिव – मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे मंजूर झालेल्या नवीन तीन खोल्यांच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.

या प्रसंगी ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नव्या खोल्यांमध्ये ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन केंद्र, अस्ट्रॉनॉमी लॅब, इंटरेक्टिव्ह डिजिटल पॅनल, तसेच वातानुकुलीत एकात्मिक प्री-फॅब वर्गखोल्या उभारण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, अद्ययावत सुविधा व डिजिटल शिक्षणाची आधुनिक साधने यामुळे विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज आणि तंत्रज्ञानसंपन्न शिक्षण व्यवस्था तयार होणार आहे.या उपक्रमाबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांनी सांगितले की, “मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव” अंतर्गत मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील एका शाळेस सदर आधुनिक सुविधा देण्यात येणार असून, धाराशिव तालुक्यासाठी आळणी शाळेची निवड झाली आहे, ही गावासाठी अभिमानास्पद बाब आहे.”भूमिपूजन सोहळा नारळ फोडून आणि पारंपरिक पद्धतीने कुदळ मारून करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये:सरपंच प्रमोद काका वीर,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. संजीवनी बाबासाहेब पौळ,उपाध्यक्ष अफसाना सलीम शेख,माजी सरपंच संतोष बप्पा चौगुले,बीट अंमलदार श्री. शिंदे साहेब,तंटामुक्त समिती अध्यक्ष श्याम बापू लावंड,पोलीस पाटील प्रमोद माळी,ग्रामपंचायत सदस्य अक्षय कदम,प्रतिष्ठित नागरिक हरिदास म्हेत्रे, अंबऋषी कोरे, सोपान काका कोरे, महेश वीर, ज्ञानेश्वर निंबाळकर, रवी कोरे, बबलू वीर, मनोज वीर, विठ्ठल वीर, पांडुरंग नाना लावंड आणि संपूर्ण शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.या नव्या इमारतीच्या उभारणीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी मिळणार असून, शाळेचा शैक्षणिक दर्जा निश्चितच उंचावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल ग्रामस्थ आणि शाळा परिवाराकडून समाधान व्यक्त करण्यात आले.