
आज दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, परंडा येथे भ्रष्टाचार विरोधी कृती समिती आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत परंडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत गंभीर आरोप करण्यात आले.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख रंजीत पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. नुरुद्दीन चौधरी यांनी मुख्याधिकारी वडेपल्ली यांच्या भ्रष्ट कारभारावर टीका करताना असे म्हटले की, घनकचरा वाहन, सार्वजनिक व शौचालयांचे काम न करताच बिलांची उचल करण्यात आली आहे. ऍड. चौधरी यांनी सांगितले की नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे शहरातील सर्व रस्ते उखडून ठेवले आहेत, ज्यामुळे नागरिकांना, वाहनधारकांना व पादचार्यांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे.रंजीत पाटील यांनी यावेळी सांगितले की, घंटागाडीचे दरमहा १८ लाख रुपयांचे बिल नगराध्यक्षांकडून परस्पर उचलले जात आहे. पालखी मार्ग व स्वामी समर्थ मंदिर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि तात्पुरत्या उपाययोजना यावरही त्यांनी आक्षेप घेतला.परंडा शहरातील गेल्या पाच वर्षांतील नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून दिनांक १० जुलै २०२५ रोजी परंडा शहर बंद ठेवण्यात येणार असून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर विधानभवन, मुंबई येथे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे यांना देखील निवेदन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.जर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली नाही, तर भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवर:रंजीत पाटील (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, जिल्हाप्रमुख),ऍड. नुरुद्दीन चौधरी (काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष),सुभाष शिंदे (माजी नगराध्यक्ष),ऍड. संदीप पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार गट),शब्बीर पठाण (शिवसेना नेते),ऍड. हनुमंत वाघमोडे,जमील खान पठाण (एमआयएम तालुकाध्यक्ष),इस्माईल कुरेशी (माजी उपनगराध्यक्ष),डॉ. अब्बास मुजावर,मन्नान बासले (माजी नगरसेवक),समीरखान पठाण,श्रीहरी नाईकवाडी (राष्ट्रवादी – शरद पवार गट),नंदू शिंदे (ओबीसी तालुकाध्यक्ष),सत्तार खान पठाण,रईस मुजावर (शिवसेना शहरप्रमुख),रमेशसिंह परदेशी (काँग्रेस शहराध्यक्ष),बाशाभाई शहा (माजी नगराध्यक्ष),खय्युम तुटके