
परंडा येथे आषाढी एकादशीनिमित्त ब्रह्मांडनायक देव बाळूमामा व विठ्ठल-रखुमाई उत्सव उत्साहात संपन्नपरंडा, ६ जुलै २०२५ (रविवार):परंडा शहरातील श्री संत बाळूमामा मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर वारी उत्सव भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

उत्सवाची सुरुवात पहाटे बाळूमामा महाराजांच्या अभिषेक व आरतीने झाली. त्यानंतर विविध भजनी मंडळांच्या सहभागाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ (सोनगिरी, रुई, दुधी, भोंजा, कुंभेजा, खासगाव) यांनी भजनी सेवा सादर केली.यानंतर सकाळी १० ते १२ दरम्यान ह.भ.प. श्री मारुती महाराज बारस्कर यांचे प्रभावी कीर्तन झाले. यामध्ये महिला व पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

संगीत विशारद श्री विजय खंडागळे सर यांच्या हस्ते मंदिरात बेल वृक्ष भेट देण्यात आला. वृक्षारोपणाचा मान पत्रकार सुरेश घाडगे, प्रमोद वेदपाठक, गोरख देशमाने, संतोष शिंदे व उपस्थित भक्तांनी स्वीकारला.यावेळी परंडा येथील सर्व पत्रकार व अन्नदात्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.आरतीनंतर श्रींना फराळ महाप्रसादाचा नैवेद्य दाखवून भक्तांसाठी फराळ महाप्रसाद वाटप करण्यात आला.सेवा-सुविधा व्यवस्थापन:चहा व्यवस्था: श्री गणेशसिंह सद्दीवालताक व्यवस्था: श्री अनंतसिंह सद्दीवालफराळ महाप्रसाद अन्नदाते: श्री लक्ष्मण भांगे, श्री बाळासाहेब पाडुळेपाणीजार व्यवस्था: अॅड. भालचंद्र औसरे सरसर्व भक्त, सेवेकरी, पत्रकार व अन्नदात्यांचे मन:पूर्वक आभार!– केशरताई वैरागे मदने यांनी मानले