
पिंपरी चिंचवड, दि. ७ जुलै २०२५ –शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी तसेच अपंग बांधवांना ६००० रुपये संजय गांधी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी अपंगांचे नेते आ. बच्चूभाऊ कडू यांच्या अमरावती ते यवतमाळ पदयात्रेला पिंपरी चिंचवड प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने “देहूगाव ते आळंदी” अशी थ्री व्हीलर रॅली काढून भव्य पाठिंबा देण्यात आला.

या रॅलीत ६० ते ७० अपंगांचे थ्री व्हीलर, २० टू व्हीलर, रिक्षा तसेच काही फोर व्हीलरने सहभाग नोंदवला.रॅलीची सुरुवात संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, देहूगाव येथून झाली.

तळवडे, चिखली, कुदळवाडी, मोशी मार्गे शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात समारोप करण्यात आला.या रॅलीचे आयोजन प्रहार अपंग क्रांती आंदोलन, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आले होते.या प्रसंगी उपस्थित प्रमुख पदाधिकारी प्रहार अध्यक्ष दत्तात्रय भोसले,उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे,महिला अध्यक्ष संगीता जोशी,रामचंद्र तांबे, रेवणनाथ कर्डिले,आळंदी शहराध्यक्षा अर्चनाताई ढुंडरे,सागर सुपल, राजाराम पाटील, शशिकांत उपाध्ये,विद्या तांदळे, स्मिता सस्ते, सज्जू धोंदडेयांनी रॅलीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.समारोपप्रसंगी उपाध्यक्ष श्री. राजेंद्र वाकचौरे यांनी संपूर्ण रॅलीदरम्यान अतिशय योग्य असा बंदोबस्त दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे विशेष आभार मानले. तसेच यापुढे बच्चूभाऊ कडू यांचा आदेश मिळताच त्यांना पाठिंबा देण्यासाठी सदैव सज्ज राहण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.
