
पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशन यांच्यावतीने देशातील सर्वात मोठा ‘पर्पल जल्लोष 2025 दिव्यांगांच्या महाउत्सव’ हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला त्यानिमित्ताने प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शहराचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त नरळे दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांचा स्मृतिचिन्ह शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्याचे नियोजन आज करण्यात आले होते परंतु आयुक्त, अतिरिक्त आयुक्त त्यांना तातडीची मिटींग लागल्यामुळे ते येऊ न शकल्याने दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांचा स्मृतिचिन्ह शाल गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

तसेच सल्लागार विजय काणेकर, अभिजीत मुरुगकर, नंदकुमार फुले, यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष दत्तात्रय भोसले उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे महिला अध्यक्ष संगीता जोशी रामचंद्र तांबे सागर सुपल स्मिता सस्ते शामकांत नांगरे शाम पाटोळे यांच्या सह शहरातील अपंग बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रेवन्नाथ कर्डिले यांनी केले.

प्रास्ताविक राजेंद्र वाकचौरे यांनी तर आभार रामचंद्र तांबे यांनी माणले. श्री राजेंद्र वाकचौरे यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतामध्ये अपंगांना कोणीतरी लढ म्हणणारा पाहिजे होता आणि आता बच्चू कडून च्या रूपाने सर्व अपंगांना आधार देणारा नेता आम्हाला मिळाला आहे त्यामुळे जनसामान्यात अपंग व्यक्तींना सन्मान मिळवून देण्यामध्ये आता कोणतीही अडचण येत नाही आणि आमच्या संघटनेचे नावच प्रहार अपंग क्रांती आंदोलन आहे त्यामुळे आज जरी आम्ही अधिकाऱ्यांचा सन्मान केला असेल तरीही उद्या जर काही चुकीचं दिसलं तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा मिस्कील इशाराही यावेळी दिला
