
नळदुर्ग : आपलं घर बालगृह नळदुर्ग जिल्हा धाराशिव येथे दिनांक ७ जून २०२५ रोजी राष्ट्र सेवा दल संचलित आपलं घर अनाथ बालगृह नळदुर्ग येथे बाल साहित्यिक आश्रुबा अंकुश कोठावळे यांचा आपलं घरचे व्यवस्थापक विलास वकील सर यांनी अनाथ मुलांनी बनवलेला फुलांचा गुच्छ देऊन स्वागत केले.कवी आश्रुबा कोठावळे यांच्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या शब्द पेरणी बालमनातील हा बालकविता संग्रह व कथांचे बीजगोळे हा बालकथा संग्रह अनाथ मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी. यासाठी दोन्ही संग्रह भेट दिले.बोलताना कवी कोठावळे म्हणाले की, मुलांनी खूप वाचलं पाहिजे व खूप अभ्यास करा.खूप मोठे अधिकारी व्हा. विद्यार्थ्यांना काही बालकविता ऐकवल्या, त्यामध्ये झिम्मा फुगडी, आभाळाला भांडू आता, तसेच ज्या कवितेची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे निवड झालेली होती,शेती मातीची कविता जोंधळा ही गेय स्वरूपात सादर केली. एक गझल ऐकवली. कविता कशी असते, कविता कशी लिहितात कवितांचे विषय कोणते विषयी मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक श्री पन्नालाल सुराणा सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास वकील सर यांनी केलं.आपलं घरं चे अधीक्षक संदीप चवले यांनी आभार मानले.कोठावळे सहकुटुंब उपस्थित होते तसेच यावेळी आपल घरचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.