विद्यार्थ्यांनी शिकून, समृध्द होवून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा – खासदार मेधा कुलकर्णी

Spread the love

ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

धाराशिव, दि. ८ (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांना कौतूकाची थाप घेताना जवाबदारी पण पेलता आली पाहिजे. शिक्षण हे माणसाला उन्नत करते, विद्यार्थ्यांनी शिकून, समृध्द होवून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असे प्रतिपादन खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले.ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिवच्या वतीने काल शनिवार, ७ जून रोजी येथील परिमल मंगल कार्यालयात आयोजित गुणगौरव सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून धाराशिवच्या माजी नगराध्यक्ष तथा यशस्वी उद्योजिका डॉ. उर्मिला गजेंद्रगडकर, जेष्ठ लेखीका, निवेदिका अर्पणा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटा निवडताना राजकारण, सैन्यदलाचाही अग्रक्रमाने विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सजग राहून आपल्या आजूबाजूला काय घडतय हे डोळे उघडून पाहिले पाहिजे. प्रत्येक जाती, धर्माचा आदर करा मात्र प्रलोभनांना बळी पडू नका, कोणतेही अभ्यासपुर्ण केलेले कार्य हे यशस्वी होतेच, पंखात बळ आणून उंच उडा असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.विद्यार्थ्यांनी त्याच्या आवडीचे क्षेत्र निवडावे म्हणजे त्यात यश मिळते असे डॉ. उर्मिला गजेंद्रगडकर म्हणाल्या. तर समजून उमजून अभ्यास केला तर हा अभ्यास आयुषभर उपयोगी पडतो. आपल्या मुलाला यंत्र बनवण्यापेक्षा चांगला माणूस म्हणून घडवा. आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नका. त्याला सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवा. मुलांशी संवाद साधा. त्याना नियोजन कौशल्ये शिकावा, मार्काच्या गणितावर आयुष्याचे गणित अवलंबुन नसते असे परखड मत अर्पणा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरीकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.या सोहळ्यात १० वी, १२ वी मधील सुमारे ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प, प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात ऋगवेद शाखा संहिता परिक्षा पास झाल्याबद्दल पुरोहित वैभव विजयकुमार घुगीकर, अनिरुध्द मुकूंद कुलकर्णी या दोघांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुजा गंधोरकर, सुत्रसंचालन डॉ. स्वप्नगंधा कुलकर्णी तर उपस्थितांचे आभार अर्पणा पाठक यांनी मानले. कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थी, पालक तसेच शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.चौकटगुणगौरव सोहळ्याच्या नियोजनाची जवाबदारी यावेळी महिलांना देण्यात आली होती. संघटनेच्या महिलांनी कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते. यावेळी उपस्थित मान्यवरासह सर्वांनी महिलांच्या प्रयत्नाचे कौतूक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button