
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात ८ प्राथमिक, ८ माध्यमिक व ४ उच्च माध्यमिक आश्रमशाळा कार्यरत आहेत. या शाळांमधून विद्यार्थ्यांना निवास, भोजन, वह्या, पुस्तके आदी सुविधा मोफत पुरविल्या जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी स्वराज्य शिक्षक संघाची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संघाचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा. फत्तेसिंह पवार यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.

जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे:जिल्हाध्यक्ष: अविनाश पवारसंपर्कप्रमुख: विठ्ठल गिरीउपाध्यक्ष: नारायण बोडखेसचिव: वसंत भुसारीसहसचिव: अविनाश दवणेकोषाध्यक्ष: देविदास पाईकरावसहकोषाध्यक्ष: अनिल राठोडकार्याध्यक्ष: प्रेमानंद धांडेसहकार्याध्यक्ष: बबन आडेसंघटक: न्यायपाल बनसोडे, विष्णुपंत भालेरावमार्गदर्शक: व्यंकटी पिंपळपल्लेसल्लागार: दुर्गादास देशमुखप्रसिद्धी प्रमुख: देवीदास सापनरसमन्वयक: उत्तम गिराम, महालिंग पटवे, प्रमोद कदमसदस्य: निवृत्ती बिडकरमहिला प्रतिनिधी: स्वाती कल्याणकरराज्य उपाध्यक्ष: रमेश जावळेराज्य समन्वयक: विशाल जाधवया नविन कार्यकारिणीचे लक्ष्मण भोपाळे, सूर्यभान वाळसे, ज्ञानेश्वर कुबडे, उत्तम आडे, गजानन हराळ, रामा इंगोले, आनंद राठोड, गणपत चट, पंढरीनाथ झुंजारे, संजय काळे आदी मान्यवरांनी स्वागत करून अभिनंदन केले.