
मालेगाव तालुक्यातील द्याने गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष, द्याने युवा सेवाभावी संस्था चे संस्थापक अध्यक्ष आणि दिव्यांग विकास कल्याणकारी संस्था चे सचिव श्री. राजेंद्र पवार यांना मा.मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते “संत गाडगेबाबा सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला.श्री. पवार यांनी गेल्या काही वर्षांपासून दिव्यांग बांधवांसाठी विविध सेवा आणि उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजना जसे की –▪ ग्रामपंचायतीचा ५% निधी,▪ घरकुल योजना,▪ संजय गांधी निराधार पेन्शन योजना,▪ महानगरपालिका हद्दीतील ५% निधी अंतर्गत पेन्शन योजना– यांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.तसेच गरजू लाभार्थ्यांना आवश्यक साहित्यांचे वितरण, योजनांची माहिती आणि मार्गदर्शन यासाठी त्यांचे सतत योगदान राहिले आहे.

पुरस्कार स्वीकारताना श्री. पवार यांनी नम्र भावना व्यक्त करत सांगितले की, “हा पुरस्कार माझ्या कार्याची पावती आहे. हा सन्मान केवळ माझा नसून माझे आई-वडील, भाऊ, नातेवाईक, मित्रपरिवार, माझ्यासोबत कार्य करणारे सर्व पदाधिकारी, व विशेषतः माझे दिव्यांग बांधव यांचा आहे. मी सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.”