
धाराशिव (प्रतिनिधी)- नवीन भारत विद्यालय ते कचरा डेपो कडे जाणारा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून, त्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी, या मागणीसाठी आज प्रहार संघटने च्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आले.सदर रस्ता काही दिवसांपूर्वी चेंबर व नाल्याच्या कामासाठी खोदण्यात आला होता. मात्र, काल झालेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.

या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना, विशेषतः जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, मोटारसायकल चालकांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

या समस्येची दखल घेऊन प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष जमीर शेख व कार्यकर्ते सोहेल शेख यांच्या उपस्थितीत धाराशिव नगरपालिकेला लेखी निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी प्रशासनाकडे रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.नागरिकांनी देखील या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास पुढील काळात प्रहार स्टाईल आंदोलनाचा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.