बच्चू कडू यांची कर्जमाफी व फळबाग उत्पादक शेतकरी समस्यांवर संवादासाठी डोंगरगावात जागर सभा

Spread the love

डोंगरगाव (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथे दिनांक २२ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता “जागर सभा” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे आयोजन समस्त शेतकरी बंधव डोंगरगाव पंचक्रोशी यांच्यातर्फे करण्यात आले असून, कर्जमाफी व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, मागण्या व उपाययोजना यावर खुला संवाद साधण्यात येणार आहे.

या सभेस लोकप्रिय शेतकरी नेते, माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा. बच्चू (भाऊ) कडू साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.सदरील सभेचे ठिकाण – हनुमान मंदिर, डोंगरगाव,वेळ – सायं. ६:०० वा.,तारीख गुरुवार, २२ मे २०२५ रोजी होणार असून सभेसाठी येणाऱ्या जनतेनी खाली दिलेल्या पदधिकारी यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ,संपर्क ८५०७१७७१७७ / ९७६६११००५२ सर्व शेतकरी बांधवांनी या जागर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button