
परंडा,ता.१९ (परंडा ) महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा दिव्यांग कल्याण विभाग माजी अध्यक्ष मा. बच्चू कडू यांचे परंडा येथील शासकीय विश्रामगृह शनिवार ता.१९ रोजी आले असता तालुक्यातील प्रहार संघटनेच्या ध्येयधोरणासह विविध मुद्द्यावर, दिव्यांगाच्या विविध प्रश्न संदर्भात चर्चा करण्यात आली.यावेळी तालुका प्रहार संघटना,दिव्यांग उद्योग समुहाच्यावतीने कडु यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे, दिव्यांग उद्योग समुहाचे अध्यक्ष तानाजी घोडके,प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश गुडे, वैभव गायकवाड , तानाजी सोनवणे, शरद गोमासे, आकाश निरफळ, रासप तालूका अध्यक्ष मनोज पाडुळे , अनिकेत कुलकर्णी,दिव्यांग तालूका प्रमुख तानाजी सांगडे,स्वानंद कुलकर्णी आदिसह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी नुकतीच बृन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) सहायक कार्यकारी अधिकारी पदाच्या निवडीबद्दल व्हाईस आॕफ मीडिया जिल्हाउपाध्यक्ष पञकार प्रकाश काशीद यांचा मा.बच्चुभाऊ कडु यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.