
दिनांक 14 एप्रिल रोजी प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चू कडू यांच्या आदेशाने अनेक दिवस प्रलंबित असणारी पुणे येथील जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली जुने नवीन अश्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांना एकत्र करून नव्या दमाने प्रहार पुन्हा उभे राहत असल्याचे यावेळी दिसून आले,प्रहारचा सेवाभाव,सामाजिक व राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात उभे करण्याच्या दृढ निश्चयाने सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी कार्य करतील. यावेळी प्रामुख्याने पुणे जिल्हा, तालुका, व पुणे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यापुढे देखील सर्व पदास न्याय मिळेल आणि योग्य व्यक्तींच्या पाठीमागे प्रहार पक्ष ठामपणे उभा राहील अशी भावना व्यक्त करण्यात आली पयावेळी श्री.महेश बडे (राज्य अभियान प्रमुख) श्री. गौरव जाछव (राज्य समन्वयक) उपस्थितीत होते.. नवनियुक्त जिल्हाउपाध्यक्ष राहुल वाळके यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे स्वागत व आभार मानले.