व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या पुढाकाराने

परंडा दि ६ ( प्रतिनिधी ) पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल परंडा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या सभागृहात सोमवार दिनांक ६ रोजी ज्येष्ठ पत्रकार रतिलाल शहा ,श्रीराम विद्वत , मुजीब काझी यांचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकुर पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार प्रभारी तहसीलदार पांडुरंग माढेकर तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे उद्योजक काकासाहेब साळुंखे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .