
परंडा : प्रतिनिधी महिला कंपाउंडर व नातेवाईकांसह तिघांनी परंडा शहरातील डॉक्टर अर्जुन काळे यांना शिवीगाळ करून पैशाची मागणी केल्याच्या घटनेच्या परंडा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी दिनांक 31 डिसेंबर रोजी निषेध करण्यात आला तसेच या प्रकरणी तहसीलदार निलेश काकडे यांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर अर्जुन अंकुश काळे हे परंडा तालुक्यात सहा वर्षांपासून वैद्यकीय सेवा करीत आहे काळे यांच्या दवाखान्यात चार वर्षापासून सहा हजार रुपये मानधनावर एक महिला कौशल्या मोहिते कंपाउंडर म्हणून काम करत होती ती महिला परस्पर रुग्णाकडून पैसे मागणी करत होती याबाबत काही रुग्णांनी डॉक्टर काळे यांच्याकडे तक्रार केली होती त्यामुळे डॉक्टर यांनी रुग्णांना पैसे मागू नका असे सांगितले होते तरी सदर महिला रुग्णांना पैसे मागण्याचे सोडले नाही डॉक्टर काळे यांनी तिला कामावरून काढले याचाच मनात राग धरून महिलेने डॉक्टर काळे यांना आत्महत्या करण्याची धमकी दिली दवाखान्यात व मेडिकल मध्ये येऊन रोहित काळे डॉक्टर काळे यांना शिवीगाळ करून धमकी दिली तसेच मेडिकल दुकानांमध्ये रोहित काळे यांना डोळ्यांमध्ये चटणी टाकून काठीने व दगडाने मारहाण केली याबाबत सदर महिलेच्या विरोधात ५ डिसेंबर रोजी तक्रार देखील दिली सदर महिलांनी वैयक्तिक राग मनात धरून डॉक्टर काळे व रोहित काळे यांचे विरुद्ध परंडा पोलीस ठाणे मध्ये खोटी फिर्याद दाखल केली आहे सदर महिलेचे नातेवाईक यांनी डॉक्टर काळे रोहित काळे यांचे खोटे माहिती सांगून त्यांची बदनामी केली कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून सदरील महिला तिथे नातेवाईक यांनी वारंवार डॉक्टर काळे व डॉक्टर वनिता यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे नसताना देखील पैशाची मागणी केली आहे यावरती योग्य ते कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर परंडा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर नितीन मोरे सचिव डॉक्टर अर्जुन काळे डॉक्टर जयश्री गोपने डॉक्टर विकास करळे डॉक्टर किरण विटकर डॉक्टर प्रदीप राऊत डॉक्टर अमोल मुसळे डॉक्टर तुकाराम काळे डॉक्टर अर्जुन काळे डॉक्टर अजित पवार डॉक्टर सरफणे डॉक्टर सचिन मोरे डॉक्टर आनंद बालदोटा डॉक्टर अमोल पवार डॉक्टर आनंद मोरे डॉक्टर नागेश जायभाय डॉक्टर आशिष ठाकूर डॉक्टर मंदार पंडित डॉक्टर मयूर मुंडे डॉक्टर चंद्रकांत शिंदे डॉक्टर देवदत्त कुलकर्णी डॉक्टर सय्यद डॉक्टर इब्राहिम तुटके आजींच्या स्वाक्षऱ्या आहेत