Income Tax | तर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या सुंदर राज्यात तुम्हाला इनकम टॅक्स भरावा लागत नाही. एक छदाम, एक पै सुद्धा तुम्हाला त्यासाठी खर्च करण्याची गरज नाही. खोऱ्याने पैसा ओढणारे श्रीमंत पण या राज्यात हा कर भरत नाही. कोट्यवधींची कमाई अगदी टॅक्स फ्री आहे. कोणते आहे हे राज्य?नवीन कर प्रणालीत करदात्यांना सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर द्यावा लागत नाही. एका निश्चित कमाईवर भारतीय नागरीक कर भरतो. त्यासाठी आयकर खाते (Income Tax Department) हे स्वतंत्र खाते तयार करण्यात आले आहे. त्यातंर्गत सर्व हिशोब ठेवण्यात येतो. देशात सर्वत्र प्राप्तिकर भरावा लागतो. त्यासाठी स्वतंत्र प्रणाली आहे. नागरिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आयकर भरावा लागतो. या राज्यात आयकर भरावा लागत नाही. भारतातील या राज्यातील 95 टक्के नागरिकांना कोट्यवधींच्या कमाईवर एक नवा पैसा सुद्धा करासाठी खर्च करावा लागत नाही. तर हे राज्य आहे सिक्कीम. येथील मूळ नागरिकांना आयकरातून सवलत स्वातंत्र्यापासूनच मिळालेली आहे. करदात्यांसाठी जणू हा स्वर्गच आहे.