
ईरला गावातील ग्रामस्थांसाठी दिव्यांग व्यक्तींनी केले आंदोलन

आज रोजी प्रहार प्रहार दिव्यांग संघटना धाराशिव च्या वतीने परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख व विभाग नियंत्रण आवारात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने घेराव आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार महिन्यापासून येथील प्रहार संघटना इर्ला शाखेच्या वतीने बस सुरू करण्याबाबत वारंवार निवेदन दिले असता त्याचा विचार गांभीर्याने न घेता उडवा उडवी ची उत्तरे गावकऱ्यांना दिले जात होती,

यावेळी गावकरी तथा प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रहार संघटनेकडे धावव घेतली यावेळी मागील चार महिन्यापासून प्रश्न मार्गी लागत नसल्याचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांना सांगितले, त्याचा वारंवार गावातील विद्यार्थी ,वयोवृद्ध व दिव्यांग बांधव यांची हेळसांड होत असलेले सांगितले तथा कायमचा मार्ग निघत नसल्याचे देखील सांगितले
यादरम्यान वारंवार निवेदन देऊनही बस सेवा सुरू होत नसल्याकारणाने वारंवार पाठपुरावा करूनही प्रहार संघटनेने शेवट आंदोलनाचे अस्त्र उगारले व आंदोलनाचा इशारा देऊन आज प्रहार संघटनेच्या वतीने परिवहन निरीक्षक यांच्या दालनात प्रहार संघटनेने आंदोलन केले यावेळी जोपर्यंत बस सेवा सुरू होत नाही तोपर्यंत कोणताही पदाधिकारी ही जागा सोडणार नाही अशी मागणी करण्यात आली या आंदोलनाची दखल परिवहन महामंडळातील निरीक्षक साहेब तात्काळ घेतले व परिवहन महामंडळाचे धाबे दणाणले यावेळी परिवहन महामंडळाकडून या गावात तीन बस सेवेची सेवा उपलब्ध करून दिल्या या आंदोलनाला यश प्राप्त करून देण्याचे कार्य प्रहार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले या आंदोलनाला प्रहार चे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,शहराध्यक्ष जमीर शेख, जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे यांच्यासह इरला शाखेचे शाखाध्यक्ष गौतम दुबे ,विकास क्षीरसागर ,तानाजी विटे ,राहुल कांबळे ,साहेबराव नेपते,रामहरी डवरे,अर्जुन वाघमारे,शिवाजी नेपते ,बाळू तांगडे ,जगन्नाथ चौरे ,धोंडीराम वाघमारे ,रंगनाथ बर्वे ,धनंजय खोडेकर ,संदीप घोडके ,बंटी खडके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेच्यावतीने या गावाला आंदोलनाच्या मार्फत न्याय देण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
यावेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी असे सांगितले दिव्याग व्यक्तीला आंदोलन करणे ही एक खूप दुःख जनक गोष्ट आहे दिव्यांग कायद्यामध्ये दिव्यांगाची हेळसांड होऊ नये म्हणून बरेच कायदे बनवलेले आहेत परंतु दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करावे लागत आहे ही एक दुःखाची बाब आहे तरी यापुढे सर्व शासकीय कार्यालय ,विभाग यांनी प्रहार संघटनेच्या मागणीला लवकर प्रतिसाद देऊन कायम सहकार्य करावे अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने अशाच पद्धतीने आंदोलन करून शासनाला वटनीवर आणण्याचे काम करण्यात येईल असा इशारा सर्व शासकीय विभागाला देण्यात आला