
दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी प्रहार दिव्यांग संघटना च्या वतीने पोस्ट कार्ड लिखो याअभियानात रेल्वे प्रवासी तसेच दिव्यांग व्यक्तींकडून पोस्टकार्ड लिहून घेण्यात आले त्यामध्ये दिव्यांगांची पेन्शन 6000 करण्यासाठी मजकूर देण्यात आला
या अभियानात 3700 पोस्ट कार्ड भरून घेण्यात आले

सदर पोस्ट कार्ड पूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री यांना पाठवले जात आहेत महाराष्ट्रातील दिव्यांग सरकारकडे लेखी मागणी पोस्ट कार्ड द्वारे करत आहे या मागणीचा विचार केला गेला नाही तर मंत्रालयावर एक मोठे आंदोलन केले जाईल असे सुरेश मोकल यांनी सांगितले
यावेळी प्रहार संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष विशाल वाघमोडे रायगड जिल्हा महिला अध्यक्ष नीलम वाघमारे पनवेल तालुका अध्यक्ष शिवाजी कांबळे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आशा गायकवाड तसेच मोठ्या संख्येने प्रहार सैनिको पदाधिकारी उपस्थित होते
