धाराशिव — श्री स्वामी समर्थ मूकबधिर निवासी शाळा धाराशिव येथील विशेष शिक्षक भगवान चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नंदीनी घोगरे फातिमा शेख अथर्व कोकाटे विश्वनाथ राजे श्रेया गोवर्धन या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 1 ते 100 पर्यंत पाढे या” एक पाऊल पुढे” या हस्तपुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिलजी खमितकर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते सच्चिदानंद बांगर प्रहार पर्वचे संपादक मयुरजी काकडे
एडव्होकेट कलवले शहाजी चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अशोक उमाप बालाजी लोमटे मुख्याध्यापक शकिल शेख भिमराव पाथरूड संजय म्हमाणे रेखा ओहोळ विठ्ठल होरडे नागेश चव्हाण व इतर अनेक नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बालाजी नादरगे यांनी मानले
भगवान चौगुले हे कवी लेखक असून दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत सर्वसामान्य विद्यार्थी जास्तीत जास्त तीस पर्यंत पाढे लिहत असताना ही दिव्यांग विद्यार्थी मात्र तब्बल शंभर पर्यंत पाढे तयार करून दाखवतात खरोखरच हे दिव्यांग विद्यार्थी सर्व सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याने त्यांचे कौतुक होत आहे
या विद्यार्थ्यांचे सचिवा लक्ष्मीबाई इटकर श्रीनिवास इटकर यांनी अभिनंदन केले