
दिव्यांगांचे हृदय सम्राट वंदनीय नामदार श्री बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली दि 26/12/2024 वार गुरवार.प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र अकोट तालुक्यात सर्वात दुर्लभ असणारा घटक म्हणजे दिव्यांग तो शरीर दृष्टीने प्रबळ नसल्यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागतो त्यात शासनाने दिव्यांगासाठी भरगोस योजना काढल्या व GR सुद्धा उपलब्ध आहेत परंतु शासन अधिकारी त्या ,GR ची अंमलबजावणी का करत नाही

दिव्यागाची एका प्रकारे थट्टा केली जाते . तसेच चोहटा बाजार खेडेगावात एका दिव्यांगाला अकोल्याला जात असताना कंडक्टर केली शिवी गाळ. तसेच त्या दिव्यांगानी प्रहार दिव्यांच्या मदतीला धावून येणारे जीवन भाऊ खवले यांनी एसटी महामंडळ आगर व्यवस्थापक पितोळे साहेब यांना दिव्यांगाच्या संदर्भात माहिती दिली दिव्यांग कमजोर असल्यामुळे दिव्यांगांनी हार मानली परंतु प्रहारचे कार्यकर्ते कधीही हार मानणार नाही. त्याप्रमने आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.

शासनाने दिव्यांगासाठी GR काढला की दिव्यांगाच्या आरक्षण सीटवर इतर कोणी बसू नये परंतु दिव्यांग न बसता इतर प्रवासी लाभ घेत आहेत त्याकरिता आगर व्यवस्थापक अधिकारी पितोळे साहेब त्यांना निवेदन देण्यात आले त्यांनी तात्काळ दिव्यांगांच्या समस्या मार्गी लावू व त्वरित त्यांनी सहकार्या केले,जवळ चौकशी कक्षाकडे माहिती दिली दिव्यांगाचे सीटवर इतर कोणीही बसू नये असे एसटी आगर अकोट व्यवस्थापक यांनी सांगितले व कंडक्टर हे तुम्हाला सहकार्य करतील .

तसेच पुरवठा विभाग तहसील कार्यालय अकोट येथील सुद्धा निवेदन देण्यात आले दिव्यांग चे रेशन कार्ड बंद आहे.दिव्यांग हा कुटुंब प्रमुख आहे व त्याचे अंतोदय कार्ड झाले नाही अशा दिव्यांगांनी त्वरित देण्यात याव्या त्यांचे अंत्योदय कार्ड होणार आहे .जो दिव्यांग कुटुंब प्रमुख नसेल व इतर दिव्यांग आहे त्याचे प्राधान्य कुटुंब म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे
तसेच तहसीलदार मानकर साहेब यांना सुद्धा निवेदन देण्यात आले बऱ्याच दिव्यांगांचे मानधन हे 1200से रुपये येत आहे अशा दिव्यांगांचे मानधन 1500से रुपये करण्यात यावे .
पंचायत समिती गटविकास अकोट अधिकारी साहेब यांना सुद्धा निवेदन देण्यात आले बऱ्याच वेळेस निवेदन देऊन सुद्धा दिव्यांगांच्या घरकुल च्या समस्या व 5% टक्के निधी व 200 चौरस फूट जागा व भाळे पट्ट्यामध्ये 50 टक्के सवलत यावर कोणतेच प्रकारची ग्रामपंचायत मधून सवलत देण्यात आली नाही ,पंचायत समिती मधून .टॉल टपरी. शिलाई मशीन .ताडपत्री.त्याकरिता बरे दिव्यांग अर्ज दिले मात्र आजपर्यंत ही पंचायत समिती अकोट मधून कोणत्याच प्रकारची दिव्यांना वस्तू मिळाली नाही ही एक लाजिरवाणी बाब आहे. या वस्तू वडकीच्या माणसांना दिल्या जातात. याविषयावर प्रहार कार्यकर्त्यांनी आज चार ठिकाणी निवेदन दिले आमच्या शासन GR नुसार अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा उपोषणाला बसू अस इशारा निवेदनात देण्यात आला. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र अकोट तालुका सचिव दिनेश म जऊळकार व महिला अध्यक्षा उमाताई भुजंग खंडार ,दिव्यांग सेवक .पंकज भाऊ पाखरे . सुनील भाऊ बागोकार .रामेश्वर भाऊ बोधडे
धम्मा भाऊ रायबोले. नाझिम अली नजाकत अली. छगन भाऊ बंकुवाले. व. मनीषाताई सपकाळ व प्रहार दिव्यांग आदी उपस्थित होते