परभणी येथील संविधानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या – रिपाई चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे ..

Spread the love

परंडा आज दिनांक 12/12/2024 गुरवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली परंडा तहसीलदार माडेकर साहेब यांना यांना निवेदन देऊन वरील मागणी करण्यात आली..

निवेदनाचा आशय असा आहे की परभणी येथे कलेक्टर कचेरी समोर परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा असून पुतळ्या समोरच ब्रांझ धातूचे संविधान प्रत उभारली आहे, काल दिनांक 10/12/2024 रोजी एका समाजकंटकाने संविधानाची तोडफोड केली आहे त्यामुळे परभणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून परभणी शहरात मोठ्या प्रमाणावर दंगल सुरू आहे तरी आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून असे कृत्य यापुढे कोणी करणार नाही असे निवेदनात म्हटले आहे..!

*याप्रसंगी रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे तालुका अध्यक्ष उत्तम ओव्हाळ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजयकुमार बनसोडे आयटीसी जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे तालुका संपर्कप्रमुख दादा सरोदे तालुका उपाध्यक्ष जय राम साळवे तालुका सरचिटणीस दीपक ठोसर तालुका नेते हरिभाऊ अडाळे तालुका नेते संजीवन भोसले बापू हावळे रामा दाभाडे बबन भोसले कबीर भोसले लखन मोहिते मिलिंद हावळे सचिन लिमकर अमोल गायकवाड प्रवीण सरोदे अक्षय बनसोडे आदेश बनसोडे प्रतीक बनसोडे सौरभ बनसोडे सुरज बनसोडे बाळू रणदिवे सागर ठोसर अण्णासाहेब भालेराव विश्वास साळवे काशिनाथ सातपुते आतिश बनसोडे शशिकांत साळवे सिद्धार्थ बनसोडे भीमराव भोसले नवनाथ कांबळे लहू चौतमाल धनाजी यशवंद प्रवीण वाकचौरे नटराज भोसले साहिल साळवे विजय ठोसर विजय बनसोडे बाळासाहेब माकणीकर सुखदेव शिंदे काकासाहेब ओव्हाळ रोहित माळी संजय वाकचौरे ओव्हाळ प्रीतम रामभाऊ गोरे विकास गोमासे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button