३डिसेंबर२०२४ ” जागतिक अपंग दीन ” प्रहार अपंग संघटना शिरवळ येथील दिव्यांगाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.बच्चु भाऊ कडू यांचे स्वीस सहाय्यक मा.गौरव जाधव सर,शिरवळ गावचे लोकनियुक्त सरपंच मा.रवी दुधगावकर, शिरवळ ग्रा.सदस्य मा.प्रकाश बापु परखंदे, मा.बाळू बोडरे, सामाजिक कार्यकर्ते मा.विजय गिरे ,अंबिकामाता संस्थान अध्यक्ष मा.राजु शेटे,शिरवळ पोलिस निरीक्षक मा.जगताप सर, शिरवळ पोलिस मा.नितीन नलवडे सर, प्रहार अपंग संघटना खंडाळा ता. अध्यक्ष प्रवीण फडतरे सर “मोकळा श्वास सामाजिक संघटना” महिला महाराष्ट्र सौ.सपना भोसले,कन्या शाळेचे मुख्याध्यापक मा.उदेश गायकवाड सर,कन्या शाळेचे मा.कांबळे सर, महाराष्ट्र न्यूज पत्रकार पोपटराव भिसे सर, खंडाळा शासकिय अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरवळ मतिमंद मुलांच्या हस्ते केक कापून, शासकिय योजना माहिती व अन्नदान करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.आज पर्यंत केलेल्या दीव्यांग कार्य बाबत कामाची दखल घेत शिरवळ दिव्यांगाच्या वतीने प्रविण भुजबळ व समिना शेख यांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमात उपस्थित सर्व शिरवळ ,खंडाळा दिव्यांगांचे,मान्यवरांचे,या कामी मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचे “प्रहार अपंग संघटना खंडाळा ता.पदाधिकाऱ्यांच्या वतीने आभार मानन्यात आले.