ग्रामपंचायत कार्यालय ढोकी येथे आज ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त ढोकी गावातील सर्व दिव्यांग बांधवांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ढोकी गावचे उपसरपंच अमोल(पापा)समुद्रे यांनी दिव्यांग बांधवांचा सत्कार करून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष इरफान वस्ताद, दिनेश पोतदार,सुशील सोनपारखे, सबदर शेख, रंजना जोशी,अब्दुल सय्यद,पोपट देशमुख,इस्माईल सय्यद,कुरेशी इत्यादी दिव्यांग बांधव,ग्रामस्थ व ग्रा.प.कर्मचारी उपस्थित होते….