उमरगा ( )
२४० उमरगा (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्ती आघाडीतील पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार सातलिंग स्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज उमरगा येथील उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला.
याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरगा लोहारा तालुका अध्यक्ष अजीम खजुरे, स्वराज्य पक्षाचे महेश गोरे, व अन्य पदाधिकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आदींसह अन्य घटक पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह माडज येथील दिनेश पाटील, महेश कुंभार सकल जंगम समाजाचे उमरगा लोहारा पदाधिकारी शंभूलिंग स्वामी, नागनाथ स्वामी, विजयकुमार स्वामी, वीरभद्रेश्वर स्वामी, महादेव चोपदार, दीपकसिंह गहेरवार, रवी स्वामी, भीमाशंकर यादगौडा, विजय स्वामी, विजय यादगौडा, सिद्धाराम कोळी, वीरभद्र स्वामी आदींसह उमरगा-लोहारा मतदारसंघातील बहुसंख्य मतदार, नागरिक उपस्थित होते.