गोव्यात चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी आईला पोलिसांनी अटक केली आहे. एका कंपनीची सीईओ असलेल्या या महिलेने असे पाऊल का उचलले हे आता समोर येऊ लागलं आहे. पण या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. कारण एक आई आपल्या मुलाला कशी मारु शकते असा प्रश्न लोकं उपस्थित करत आहेत. आरोपी महिलेची पोलीस चौकशी करत आहेत. शनिवारी पोलीस महिलेला घेऊन त्याच हॉटेलमध्ये पोहोचले जेथे तिने मुलाची हत्या केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी नेल्यानंतर महिलेने अनेक नवे खुलासे केले आहे. ज्यामुळे हत्येमागचा हेतू स्पष्ट होताना दिसत आहे.