राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात संघर्ष सुरु आहे. शरद पवार वयाच्या ८५ व्या वर्षी पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सोबतीला सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील आहेत. त्याचवेळी अजित पवार आपला गट अधिक मजबूत करत आहेत. आता अजित पवार पुन्हा शरद पवार यांना धक्का देणार आहे. सांगलीतील शरद पवार यांचे विश्वासू जयंत पाटील यांना हादरा बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सांगलीतील जयंत पाटील यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मुंबईतही घडामोडी झाल्या.