कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणाने पुणं हादरलं. या प्रकरणी रोज नवे खुलासे होतात. आता याप्रकरणात मोठे अपडेट्स समोर आले आहेत. या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली असून आरोपींची संख्या 13 वर गेली आहे.पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणी मोठे माहिती समोर आली आहे. या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून आता अटकेतील आरोपींची संख्या 13 वर पोहोचली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाकडून काल रात्री 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. आदित्य गोळे, नितीन खैरे या दोघांसह आणखीन एका आरोपीला मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.