अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, संभाजीनगर | 13 जानेवारी 2024 : मुंबईतील न्हावा शेवा सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या उद्घाटनावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो का नव्हता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेजी, तुम्ही नरेंद्र मोदीसाहेबांची बरोबरी करू नका!, असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.