दिव्यांगांचे पगार पाच तारखेच्या आत जमा व्हावे तसेच अंतोदय योजने अंतर्गत दिव्यांगाना रेशन उपलब्ध करण्यात यावे तसेच ग्रामपंचायती ने 5%निधीचे वाटप दरवर्षी करण्यात यावे याकरिता तेल्हारा तालुकयातील प्रहार दिव्यागं संस्थे ने तहसीलदार v गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर केले . दिनांक 15/10/24 ला तहसील कार्यालय तेल्हारा येथील व पंचायत समिती तेल्हारा .या दोन्ही ही विभागातील निवेदन देण्यात आले दिव्यांगांचे हृदय सम्राट वंदनीय नामदार श्री बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार च्या वतीने माननीय तहसीलदार सोनवणे साहेब व तसेच पंचायत समिती काळे साहेब यांना निवेदन देण्यात आले तहसील कार्यालयावरील प्रमुख मागण्यामध्ये दिव्यांगांचे महिन्याच्या पाच तारखेला मानधन देण्यात यावे तसेच दिव्यांग हा शासनाच्या जीआर नुसार अंतोदय मध्ये समाविष्ट करण्यात यावा व तसेच गटविकास अधिकारी यांना दिव्यांगांचा शासनाच्या जीआर नुसार दिव्यांगांचा 5% निधी हा वर्षाच्या मार्च शेवटी वाटप करण्यात यावा अशा मागण्या तहसील कार्यालय व पंचायत समिती या दोन्ही विभागातील निवेदन देण्यात आले. तसेच तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागातील नव नियुक्त आलेल्या नायब तहसीलदार ज्योतीताई मॅडम. यांचे गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.उपस्थित प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या अकोला महिला जिल्हा उपप्रमुख व तालुका तेल्हारा अध्यक्षा सौ संध्याताई उद्धवराव ताथोड सौ छायाताई दिपक इंगळे. स्वप्निल भाऊ खंडेराव . अमोल बुरघाटे .विनोद भाऊ खूमकर. संतोष वाघमारे.राजू भाऊ वानखडे. मुस्तखान.शहिद खान. इतर दिव्यांग उपस्थित होते