निवडणुकीमध्ये मतदानाची तक्केवरी वाढावी म्हणून शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात ,तरी पण निवडणुकीत १०० टक्के मतदान होत नाही लोकांमध्ये मतदानविषयी जागृती व्हावी व देशात लोकशाही मजबूत व्हावी यासाठी आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा आळणी च्या वतीने मतदान जनजागृती करण्यासाठी सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली . व अठरा वर्षा च्या पुढील सर्व मतदारांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे परगावी राहणारे जवळचे नातेवाईक ,मामा,मामी,मावशी , आत्या , आजी,आजोबा व जवळच्या नातेवाईकांनी 100 तक्के मतदान करावे म्हणून पोस्टकार्ड पाठऊन आवाहन केले .प्रत्येक विध्यर्थ्याने किमान पाच पोस्टकार्ड पाठविली .या कार्याचा शुभारंभ मा.श्री अशोक पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक , मां. श्रीमती सुधा साळुंके शिक्षणाधिकारी माध्यमिक , मां .श्री असरार सय्यद गट शिक्षाधिकारी पं .स .धाराशिव यांच्या हस्ते करण्यात आला. व पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांच्या जवळच्या नातेवाईक यांना 1500 पत्रे एकाच वेळी पाठविण्यात आली या कार्यात शाळेतील 260 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला मा.शिक्षण अधिकारी प्राथमिक,माध्यमिक , गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व मुलांचे कौतुक केले व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन मुलांची गुणवत्ता पाहिली व समाधान व्यक्त केले .तसेच सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले .यावेळी मा.श्री प्रकाश पारवे,श्री भारत देवगुडे, शिक्षण विस्तार अधिकारी , मा.श्री निलेश नागले केंद्रप्रमुख हे उपस्थित होते . सदर उपक्रमात श्रीमती सुनीता कराड,वर्षा डोंगरे,मंजुषा नरवटे,क्रांती मते,सुलक्षणा ढगे,सत्यशिला म्हेत्रे ,राधाबाई वीर ,श्री उत्तम काळे,दिनेश पेठे ,हनुमंत माने ,दादासाहेब कचरे यांनी परिश्रम केले.*