धाराशिव कळंब मतदारसंघातून मयूर काकडे यांना तर भूम परंडा वाशी वर्षद शिंदे यांना उमेदवारी मागणार प्रहार चे संपर्कप्रमुख नागनाथ पाटील यांची मागणी
बच्चुभाऊ कडू ,छत्रपती संभाजी महाराज, राजू शेट्टी व अन्य घटक पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या महापरिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या वतीने प्रहार संघटनेच्या माध्यमातून कळंब मतदारसंघातून मयूर काकडे तर भूम परंडा वाशी या मतदारसंघातून वार्षद शिंदे यांच्या नावाची मागणी येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क नागनाथ नरोटे पाटील यांनी पत्रद्वारे बच्चू कडू यांना केली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये चारही मतदारसंघातून येणारा काळात महा परिवर्तन महा शक्ती च्या माध्यमातून तुल्यबळ लढत आपल्याला महा परिवर्तन महाशक्ती च्या माध्यमातून दिसून येणार आहे
यादरम्यान परंडा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रहार चे संपर्कप्रमुख नागनाथ नरोटे पाटील यांनी प्रहारचे जिल्हाप्रमुख वर्षाद शिंदे तथा जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या उपस्थितीत केली त्यावेळी मागील कित्येक वर्षापासून प्रहार संघटनेच्या माध्यमातून मयूर काकडे यांनी अतुलनीय कार्य केलेल्या समाजाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून त्यांचे काम पोचलेले आहे आणि बच्चुभाऊ त्यांचा विश्वास असणारे चेहरा व बच्चू भाऊची जवळचे मानले जाणारे मयूर काकडे दिव्यांग क्षेत्रसहित इतर क्षेत्रातही मोलाचे कार्य या जिल्ह्यांमध्ये असून जिल्ह्यात एकूण तब्बल 113 शाखेचे प्रचार व प्रसार प्रहारच्या माध्यमातून केलेला आहे सामाजिक क्षेत्रातील कितीतरी पुरस्काराने मयूर काकडे यांना गौरविण्यात आलेले आहे जिल्ह्यातील एक चांगला चेहरा येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे असे असे यावेळेस जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नरोटे पाटील यांनी सांगितले
त्याचबरोबर प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्षे शिंदे यांनी केलेले आजपर्यंत कामाचे कौतुक करून त्यांना देखील भूम परंडा वाशी या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी असल्याचे सांगितले यावेळी पक्ष व संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे नागनाथ नरोटे पाटील यांनी सांगितले
येणारा काळात महाशक्ती महा परिवर्तन च्या माध्यमातून इतर जागेच्या इतर जागेच्या बाबतीत सर्व घटक पक्षाशी चर्चा करून उमेदवार देण्याच्या बाबतीत राज्य संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आदेश त्याप्रमाणे इतर जागेचा इतर जागेचा सर्वे करून माहिती सोपविण्यात येणार आहे असे प्रहार चे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी सांगितले