प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन धाराशिव च्या माध्यमातून धाराशिव शहर शाखेच्या वतीने नगरपालिका धाराशिव येथे दुसऱ्यांदा निवेदन देण्यात आले त्या निवेदनाच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील नोंदणी पासून वंचित असणाऱ्या दिव्यांग बांधवांच्या नोंदी करण्याच्या संदर्भात निवेदन देऊन या निवेदनामध्ये नगरपालिके अंतर्गत शहरातील दिव्यांग बांधवांसाठी जाहीर प्रगटन वृत्तपत्राच्या माध्यमातून करून शहरातील वंचित असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात यावे, दिव्यांगांना शहरी हद्दीत व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, नगरपालिकेमध्ये त्यांच्या सोयीसाठी दिव्यांग मदत कक्ष स्थापन करणे, नगरपालिका अंतर्गत असणारा मागील तीन ते पाच वर्षात ल्या पाच टक्के निधी किंवा नगरपालिकेचे एकूण उत्पन्न याची माहिती पत्रानिहाय देणे, शहरातील दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेमध्ये प्राधान्य देणे,दिव्यांगांना गायरान जमिनीच्या जागेत प्राधान्याने जमीन देण्यात यावी, नगरपालिकेच्या नोंदणीपासून वंचित आहेत अशा दिव्या बांधवांची नोंदणी लवकरात लवकर करून त्यांची नोंद नगरपालिकेत करण्यात यावी तसेच ग्रामीण भागात नोंदीत असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीने देखील शहरी नगरपालिकेमध्ये नाव नोंदवलेले आढळलेले आहे अशा दिव्यांग व्यक्तीवर कारवाई करणे तसेच सरकारी नोकरीमध्ये किंवा सरकारी कर्मचारी असताना देखील काही दिव्यांगाने नगरपालिकेच्या अनुदानासाठी नगरपालिकेचे नाव नोंदवले आहे अशावर देखील कारवाई करणे, यामध्ये नगरपालिका अंतर्गत येणारा पाच टक्के हा येणाऱ्या दिवाळीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप करून त्यांची दिवाळी आनंददायी करवि व दिवाळीला त्या पैशाचा हातभार म्हणून त्यांची दिवाळी साजरी होण्यास मदत होणार आहे, येत्या दिवाळीच्या आत जर दिव्यांकाचा पाच टक्के निधी वाटप करण्यात नाही आला तर नगरपालिकेच्या नगरपालिकेमध्ये दिवाळीत फटाके फोडून आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला, प्रहारच्या या मागणीमुळे शहरातील दिव्यांग बांधवांना एक मोठा आधार होणार आहे आणि त्यामुळे त्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे या स्तुत्य उपक्रमानिमित्त प्रहार संघटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि शहरातील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अद्याप नगरपालिकेमध्ये झालेली नाही त्यांनी त्वरित आपली नोंदणी नगरपालिकेमध्ये करून घ्यावे अशी आव्हान प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे व शहराध्यक्ष जमीर शेख यांनी केले आहे
यावेळी निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह संजय शिंदे चनाप्पा घोडके,तानाजी साळुंखे, संदीपान इंगळे राजेश भिसे, सुनील सांगवेकर, धनंजय चव्हाण मुकुंद बनसोडे, संजय इंगळे, बनसोडे अजित, धनंजय इंगळे, फरीन शेख, इस्माईल सय्यद, बालाजी तांबे रशीद शेख, दत्ता पवार, किशोर जगताप आदी प्रहार चे पदाधिकारी उपस्थित होते