मुख्यधिकारी यांना प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदन…
आज रोजी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे नगर पालिका धाराशिव यांना दिव्यांगाच्या वतीने या वर्षीचा 5% दिव्यांग खर्च करण्याकरिता निवेदन देण्यात आले प्रहार संघटनेच्या वतीने या अगोदर देखील 5% निधी संदर्भात निवेदन देऊन व पाठपुरावा करून शहरातील दिव्यांग व्यक्तींना न्याय देण्याच काम प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले ,तसेच शासकीय नियमानुसार स्थानिक स्वराज संस्था अंतर्गत चा 5 % निधी या वर्षीही देण्यात यावा या आशयाचे पत्र देण्यात आले , यावर्षीचा निधी अद्याप खर्च झालेला नाही तो निधी लवकरात लवकर खर्च करावा ही मागणी पत्राद्वारे केली आहे. तसेच या दरम्यान शहरातील ज्या दिव्यांग बांधवांनी आजुन आपली नोंदणी नगर पालिकेत केलेली नाही अश्या दिव्यांग बांधवांची नोंदणी लवकरात लवकर करून त्यांना देखील या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी देखील पत्रात केली आहे
या संदर्भात कोणतीही अडचण असल्यास प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, शहरध्यक्ष जमीर शेख यांना संपर्क साधावा असे आवाहन मयुर काकडे यांनी केले आहे
नगर पालिकेने हा निधी 8 दिवसात नाही दिल्यास प्रहारच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे
यावेळी जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह शहरध्यक्ष जमीर शेख,जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे,बालाजी तांबे,नवनाथ कचार,बाळासाहेब पाटील,संजय शिंदे,नितीन जाधव, दत्ता पवार,मारुती पाटील,संजय कारभारी , राजेश भिसे,रशीद शेख,अमजद शेख, छाया शेरकर आदी पदधिकरी उपस्थित होते…