खोट्या दिव्यांग प्रकरणात आ. बच्चु कडू यांनी लक्ष घालून विशेष मोहिम राबविली होती या मोहिमेची दाखल घेऊन सरकारंने दिव्यांगांबाबतचा कठोर GR काढला आहे या GR मध्ये
शासकीय नोकरी आणि अनुदानित संस्थामध्ये नोकरी करणाऱ्या दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
राज्यात प्रसिद्ध असणारे माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात गाजलं. बोगस कागदपत्रांची पूर्तता करून युपीएससी रँकची नोकरी मिळवली. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर (UPSC) पूजा खेडकरचे अनेक कारनामे समोर आले. तिच्या नोकरीवर गदा आलीच शिवाय गुन्हाही दाखल झाला. या प्रकरणानंतर आता राज्य सरकार सावध झाले असून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने हा आदेश दिला आहे. शासकीय निधी मिळणाऱ्या संस्थांमध्ये विभागांमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची तपासणी होणार आहे. शासकीय नोकरी आणि अनुदानित संस्थामध्ये नोकरी करणाऱ्या दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.