अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कर्तव्यावर हजर असलेले पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, तसेच महिला पोलीस अधिकारी व इतर पोलीस कर्मचारी पोलीस यांच्याशी स्टेशनमध्ये जाऊन माझा फोन रेकॉर्ड कशासाठी केला असे विचारून पोलीस उपअधीक्षक साहेबांच्या टेबलावर मोबाईल सदृश्य वस्तू आदळून जोरजोरात त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालत होत्या. त्यांचा हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पहिला असून अशा वादग्रस्त आणि कायद्याची जाण नसणाऱ्या महिला खासदारावर ३५३ चा गुन्हा दाखल करण्यात यावा , जेणेकरून यापुढे कोणताही राजकीय नेता पोलीसांशी हुज्जत घालण्याची हिंमत करणार नाही
त्यामुळे वारंवार पोलीसांशी हुज्जत घालून त्यांचा सतत अपमान करून प्रत्येकवेळी शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याच्या एकमेव महिला खासदार नवनीत राणा यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर ३५३ चा गुन्हा दाखल करून त्यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात यावी, अन्यथा पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे नवनीत राणा यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येईल पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदना द्वारे मागणी आहे.