
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव अर्पण दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य तथा प्रहार दिव्यांग् क्रांती आंदोलन धाराशिव च्या वतीने जयंतीचा इतर खर्च टाळून,समाजाला हानिकारक असलेला डॉल्बी बाकीचा इतर खर्च टाळून तहानलेल्या लोकांना पाणी पाजण्याचे काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून करण्यात येनारआहे त्याची सुरुवात प्रहार आपण क्रांती आंदोलन शाखा ढोकी येथे करण्यात आली.

जनतेला रोज पिण्याच्या पाण्याची सोय इथे करण्यात येणार आहे पुढील काळात प्रहार संघटनेच्या माध्यमातून जिथे जिथे प्रहार संघटनेच्या शाखा व पदाधिकारी अस्तित्वात आहेत तिथे ते अशा पद्धतीच्या पानपोयी चे आयोजन करण्यात येणार आहे

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.बच्चू भाऊ यांच्या आदर्श विचारानुसार प्रहार दिव्यांग धाराशिव चे कार्य अविरत चालू असताना दिसत आहे असे उदगार गावचे सरपंच अमोल पापा समुद्र यांनी यावेळी व्यक्त केला, शिव अर्पण व प्रहार संघटनेच्या माध्यमातून जिथे शाखा तिथे पण होईल हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येणार आहे,व पानपोई या लुप्त होत असलेल्या संस्कृतीला जीवनदान देण्याचं काम आम्ही करणार आहोत असे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी सांगितले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर जी काकडे तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच अमोल पापा समुद्रे यांच्यासह प्रहार संघटनेचे जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे सर ,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,तालुका समन्वयक दिनेश पोतदार,ढोकी गणाचे प्रमुख शिवाजी पोतदार, तालुका संपर्कप्रमुख नवनाथ कचार, संजय नाईकवाडी,इरफान वस्ताद,सबदर सय्यद, कुंडलिक कसबे, पोपट कांबळे, वाजिद मौलाना, मजीद पठाण, अब्दुल सय्यद, गनी सय्यद, नाना कुंभार, बिलाल कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन दिनेश पोतदार, शिवाजी पोतदार,सब्दर सय्यद व समस्त ढोकी प्रहार व शिव अर्पण दिव्यांग संघटना पदधिकारी यांनी केले