प्रहार दिव्यांग संघटनेचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र
शासकीय व निमशासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळावे या साठी प्रहार दिव्यांग संघटना धारशिवच्या वतीने देण्यात आले जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,यांच्यासह बाळासाहेब पाटील,बाळासाहेब कसबे,महादेव चोपदार,तुळजापूर तालुकध्यक्ष मारुती पाटील,नवनाथ कचार,दत्ता पवार,विठ्ठल चव्हाण आदींच्या सह्याचे निवेदन निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले, जिल्ह्यातील सरकारी दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने कळविले आहे, केंद्र व राज्य निवडणूक आयोगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे न देण्याबाबत सूचना दिल्या आहेत,शारीरिक आव्हाने असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीत धावपळीची कामे करणे अशक्य होते, या बाबत सकारात्मक निर्णय घेऊन दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करावे अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी प्रहार दिव्यांगसंघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी निवडणूक अधिकारी यांनादिलेल्या निवेदनाद्वारे द्वारे केली आहे