उमरेगव्हाण येथील प्रहारचे दिव्यांग पदधिकारी विठ्ठल गोविंद चव्हाण व गोविद रामा दंडगुले रा. उंबरेगव्हाण ता. जि. धाराशिव यांच्या शेतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे रासायनिक केमिकल पाणी मागील ६ वर्षापासुन येत असुन कारखाना यांचेकडे वारंवार तकार देवुनही दखल घेत नसल्यामुळे,जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव समोर आमरण उपोषण बसले होते
वारंवार पत्राद्वारे कळविण्या येऊन सुद्धा शासन स्तरावरून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने विठ्ठल चव्हाण आमरण उपोषण करीत होते. यादरम्यान प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे व प्रहारचे बाळासाहेब पाटील,दत्ता पवार,बंटी खडके,हरीचंद्र मगर,राजू चव्हाण, यांनी ताबडतोब दखल घेऊन प्रत्यक्ष ठिकाणी येऊन शासनाला दखल घेण्यास भाग पाडले तरी यावेळी प्रहारच्या दबाव मुळे शासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांची मागणी मान्य करून त्यांचे शीत पेय पाजून उपोषण सोडविले