धाराशिव जिल्ह्य़ातील प्रहारचे कळंब तालुकाध्यक्ष मा. गणेश बबन शिंदे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दि. 5 मार्च 2024 रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी 5% दिव्यांग निधी त्वरित वाटप करावा या बाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन. मा. चकोर साहेब, गटविकास अधिकारी, कळंब यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व सरपंचांना दि. 12 मार्च 2024 रोजी आदेश देऊन 5% दिव्यांग निधी 3 दिवसात वाटप करण्याची सक्त ताकीद दिली आहे.
तालुकाध्यक्ष गणेश शिंदे यांना या पाठपुराव्यासाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मा. मयुरजी काकडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कळंब तालुक्यातील दिव्यांग शेख सादेक आतार, मारुती वाघमारे, धनंजय पारेकर, अशोक कुलकर्णी, वसंत जाधवर इत्यादींचे सहकार्य लाभले.