प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन धाराशिवच्या भुम,परंडा,वाशी तालुक्याच्या प्रसिद्धीप्रमुखपदी भुम येथील नयन अभय नाहटा यांची निवड करण्यात आली.दिव्यांग क्षेत्रात आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी नयन नाहटा यांची निवड करण्यात आली ,प्रहार संघटनेच्या संपर्क कार्यालय धाराशिव येथे हे निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील ,दत्ता पवार,विठ्ठल चव्हाण, आदी पदाधिकारी उपस्थित होते, निवडीदरम्यान भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेछा देखील देण्यात आल्या,या निवडीचे भुम,परंडा,वाशी तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे