प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन व शिवअर्पण दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्तविद्यमानाने मोफत दिव्यांग रेल्वे पास नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता
यावेळी दिव्यांग संघटनेतर्फे धाराशिव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत दिव्यांग रेल्वे पासकरिता नोंदणी करण्यात आली धाराशिव येथील शिव अर्पण दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य व प्रहार दिव्यांग संघटना धाराशिव यांची दिव्यांग रेल्वे पास नोंदणीकरिता शासकीय विश्रामगृह येथे हजार ते बाराशे च्या आसपास दिव्यांग बांधव उपस्थित होते
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन व्हॉइस ऑफ मेडियाचे अध्यक्ष पांडुरंग मते व मल्लीकार्जुन सोनवणे होते तर अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विकास बाराते डॉक्टर अमोल खंडागळे डॉक्टर महेश पाटील अस्थिव्यंगसहाय्यक अजित पवार यांनी मोलाचे सहकार्य केले तर
दरील आयोजन प्रहार दिव्यांग संघटनेचे व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे,बाळासाहेब पाटील जमीर शेख बाळासाहेब कसबे बालाजी तांबे,नवनाथ कचार,संजय नायकवडी,दिनेश पोतदार, संदीप घोडके,प्रकाश खडके विठ्ठल चव्हाण शिवाजी पोद्दार,दत्ता पवार,बाबा भोईटे, सरताज पठाण,श्रीमंत गरड,मोहम्मदअत्तार,आदी पदाधिकारी उपस्थित होते,याकरिता धारशिव जिल्हाधिकारी,जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी सांगितले.