शासनाकडून दिव्यांग व्यक्तींना एसटी बस प्रवासाप्रमाणे रेल्वेतही सवलत दिली जाते. दिव्यांग व्यक्तींना सवलतीत प्रवास करता यावा, याकरिता प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात मोफत येथे दिव्यांग रेल्वे पास नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे. धाराशिव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी सकाळी ११ वाजता आधार कार्ड झेरॉक्स चार सत्यप्रत व दिव्यांग प्रमाणपत्राच्या चार सत्यप्रत व चार रंगीत पासपोर्ट फोटो घेऊन येण्याचे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांतीआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह बाळासाहेब कसब,बाळासाहेब पाटील,जमीर शेख,दिनेश पोतदार,दत्ता पवार, नवनाथ कचार,बाबासाहेब भोईटे,विठ्ठल चव्हाण,राजेश भिसे,संजय शिंदे, बालाजी तांबे,रशीद शेख व धाराशीव तालुक्यातील तालुका पदाधिकारी व शाखाध्यक्ष यांनी केले आहे.सदरील शिबीर धाराशिव तालुक्यानंतर सर्व तालुकास्थरावर राबविण्यात येणार असे शिव अर्पण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी यावेळी सांगितले…