दि 9.3 2024 धाराशिव शहरातील मध्यवती भागात असणाऱ्या श्री चित्रमंदिर येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी दवारा निर्मित व विश्व विद्यालयाचा पूर्ण इतिहास दर्शविणाऱ्या “द लाईट” या चित्रपटाचा शुभारंभ शहारातील मुख्य पत्रकार व इतर मान्यवराच्या सुभ हस्ते झाला .
यामध्ये चित्रपट गृहाचे मालक व युवा नेते आदित्य भैया गोरे,दैनिक संघर्ष चे संपादक संतोष हंबीरे,प्रहार पक्षाचे व जिल्हा दिव्यांग संघटनाचे अध्यक्ष मयुर काकडे,वाघोलीच्या सरपंच सुलभा ताई खडके,प्रेमाताई सुधिर पाटील,दै स्वराज्य चे प्रतिनिधी जी बी राजपूत,एकमतचे मच्छीद्रनाथ कदम शाम गंगावणे,लोकपत्र चे सुधिर पवार,राजे माता ,संचालिका ज्योती बहनजी,अश्विनी पिंपळे बहनजी मंच संचालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते या वेळी मान्यवराचे स्वागत सत्कार करून दिप प्रज्वलन करण्यात आले मान्यवराना आध्यात्मिक साहित्य भेट करण्यात आले
दै संघर्ष ये संपादक संतोष हंबीरे यानी उद्घाटन झाल्याचे घोषीत केले यावेळी चिगपर गृहामधे सुमारे 500 एवढे प्रेक्षकानी याचा लाभ घेतला मंच संचलन ब्र कु सुरेशभाई जगदाळे यानी केले . हा चित्रपट 10 मार्च रोजी देखील दाखविला जाणार आहे . याचा सर्व शहरवासी मी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .